राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. गोंदिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार पक्ष सोडून गेल्यासाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरण्याच्या मुद्द्यावरुन मुनगंटीवर यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेऊन स्वत:चा घात करुन घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
#SudhirMungantiwar #EknathShinde #UddhavThackeray #BJPShivSena #ElectionCommission #Maharashtra #Mashal #Symbol #MulayamSinghYadav #HWNews